आपण किती दिवस न झोपता राहू शकतो....?

आपण किती दिवस न झोपता राहू शकतो….?

आपण किती दिवस न झोपता राहू शकत असेल बर…? हा प्रश्न थोडा विचित्र पण खूप महत्त्वाचा आहे.!

खास करून नौकरी करणारे व व्यावसायिक लोकांसाठी तर खूप महत्त्वाचा.
कंपनी मध्ये नौकरी करणाऱ्याची संख्या खूप मोठी आहे, त्यातील भरपूर साऱ्या कंपन्या या २४ तास चालू असतात. मग त्यानुसार लोकांची शिफ्ट व्यवस्था केली गेलेली असते.

आठवडाभर तर, कुणाची महिना भर रात्रीची शिफ्ट असते. दिवसाला घरी झोपायचं आणि रात्रीला ड्युटी वर जायचं. यामुळे पार झोपेचं खोबर झालेलं असत. यातीलच थोडी व्यथा व्यावसायिकांची झालेली असते.

आपल्या हक्काचा व्यवसाय चालावा व खूप मोठा व्हावा. त्यासाठी त्याची रात्रंदिवस जी धडपड सुरू असते, त्यात त्याला जेवणाचं व झोपेचं भान नसत आणि झोपेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शारिरीक व मानसिक तणाव त्याला जाणवतो.

आणि अस असताना देखील एका मुलाने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. त्याच नाव आहे. रॅन्डी गार्डनर
त्याने सर्वात जास्त काळ न झोपण्याचा विक्रम नोंदविला.

तो तब्बल 11 दिवस आणि 25 मिनिटे (264.4 तास) न झोपता राहाला आणि त्याचे वय तेव्हा फक्त १७ वर्ष इतके होते. हा विक्रम त्यांनी १९६४ मध्ये केला. हा कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो उच्च माध्यमिक शाळेतील  विद्यार्थी होता.

त्याच्यामध्ये होणारे परिणाम….

दहाव्या दिवशी जेव्हा डॉक्टर त्याला तपासत होते. तेव्हा त्यांना असे आढळले की, रॅन्डी गार्डनर यामध्ये…

मूडपणा  (moodiness)

एकाग्रतेसह समस्या (problems with concentration)

अल्पकालीन स्मृती (short term memory)

मतिभ्रम (hallucinations)

या सगळ्यांचा समावेश होता. अकराव्या दिवशी त्याला सात वेळा १०० ही संख्या वारंवार वजा करायला सांगितली. तेव्हा तो ६५ वर थांबला. तर त्याला डॉक्टरनी विचारले काय झालं तर तो त्यावर म्हणाला. मी नेमकं काय करत होतो तेच विसरलो.

त्याचा अकराव्या दिवसाचा विक्रम नोंदवण्यात आला, त्या दिवशी तो १४तास झोपला. नंतर त्याला आपोआप जाग आली. नंतर तो रात्रीचे ८:४० ते रात्रीचे ७:३० पर्यंत जागी होता. नंतर तो दुसऱ्या दिवशी १० तास झोपला. दोन ते तीन आठवड्यात तो पुन्हा रिकव्हर (आधीसारखा) झाला.

त्यानंतर बरेच लोकांनी रॅन्डी गार्डनर चा रेकॉर्ड तोडला. परंतु अद्याप कळले नाही, की माणूस किती दिवस न झोपता राहू शकतो. त्याकरिता लोक एकमेकांचा रेकॉर्ड तोडायला लागले.

कुणाला रेकॉर्ड नोंदवण्यापाई जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या करिता रेकॉर्ड ठेवणे बंद केले आहे. म्हणून फक्त रॅन्डी गार्डनर याचाच रेकॉर्ड जास्त दिवस न झोपता राहणारा माणूस म्हणून नोंदविण्यात आला आहे.

रॅन्डी गार्डनरच्या रेकॉर्ड मूळ आज आपल्याला कळलं आहे, की जास्त दिवस न झोपता राहलो, तर काय परिणाम होऊ शकतात.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

हे वाचलंत का ? –

1 thought on “आपण किती दिवस न झोपता राहू शकतो….?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!