Image Source-Google/ Image By- Financial Express

गुंतवणूक कशात करावी…?

“पैसा बँकेत ठेवल्या पेक्षा तो गुंतवा म्हणजे, त्यापासून आपल्याला भविष्यात चांगला परतावा मिळेल.!”
अस तर आपण खूप लोकांच्या तोंडातून ऐकलं. पण नक्की गुंतवणूक करायची कशात हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो.

आणि आजकाल गुंतवणूक म्हटलं म्हणजे सर्व एकाच दिशेने  घोड्या सारखे पळत सुटले आहेत.

ज्याला बघावं तो म्हणतो..” भाऊ आपण तर एक फ्लॅट घेतला, आणि तो रेंट(भाड्याने) दिला. आत्ता तर पैसाच पैसा.

बरोबर ना….! कारण सर्वांना तसच वाटत पण आत्ता परिस्तिथी बदलेली आहे.
आधी सारख आत्ता त्यात मज्या नाही.

३० ते ४० लाख रुपये देऊन तुम्ही दुसरं घर घेता. आणि त्याला भाड्याने देता. आणि तुम्ही थोडा विचार केला, का की तुमचा पैसा यातून परत निघायला किती कालावधी लागतो.

घरपट्टी, पाणीपट्टी, सोसायटी चार्जे आणि महिना अखेरीस भाडं जमा करायची परत डोक्याला कटकट. यात नाकीनऊ येतात . कारण सर्वच भाडेकरू चांगले असतातच अस नाही. आणि त्यात बॅचलर असलेत, तर झालंच तुमच काम….नुसती डोक्याला कटकट.

आणि महिना संपताच १५ हजार भाडं जरी तुमच्या हातात पडत असेल, त्यातीलच काही पैसे दुसऱ्या हातातून कधी निसटता हे देखील कळत नाही.

वर्षच्या शेवट आपल्या हातात येतो ते ६० हजार ते ७० हजार.
नंतर तुम्हाला त्यात फसल्या सारख वाटत. मग काही दिवसांनी तोच फ्लॅट आपण विकायला काढतो.

मग कशाला इतक्या खटपटीत पडायचं.
गुंतवणूक करायला एकच थोडी पर्याय आहे. त्यातील काही पर्याय जे मला माहित आहे ते मी आज तुम्हाला सांगणार.

गुंतवणूक कशात करायला हवी….?

१) शेयर मार्केट

२) फिक्स/रिकरिंग डिपॉझिट

३) म्युच्युअल फंड

याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. पण त्याबद्दल तुमची शंका क्लिअर होईल.

   Image Source-Google/ Image By- Money Control

१) शेयर मार्केट:- यामध्ये आपण एखाद्या कंपनी चे शेयर विकत घेतो. म्हणजे त्या कंपनीचा काही वाटा. त्या कंपनीला प्रॉफिट (फायदा) तर तुम्हाला फायदा आणि त्याला लॉस (नुकसान) तर तुम्हाला पण नुकसान.

कारण आपले जितक्याचे शेयर असणार तितका आपला त्या कंपनी मध्ये वाटा असणार. यामध्ये जोखीम खूप प्रमाणात आहे. त्यासाठी मार्केट चे खूप नॉलेज असायला पाहिजे.
याबद्दल नॉलेज असेल तर यात उतरावे.

२) फिक्स/रिकरिंग डिपॉझिट:- हे तर सर्वांच्या परिचयाचे असणारच. कारण यात आपण आपले पैसे काही कालावधी साठी बँकेत जमा करतो . त्यानुसार आपल्याला काही परतावा मिळतो. ते पण कमी प्रमाणात आहे. यात ७% ते ८% व्याज दर असतो. आणि ही सर्वाधिक सुरक्षित अशी गुंतवणूक आहे.पण त्यात खूप वेळ जातो आणि त्या प्रमाणे मोबदला नाही मिळत.

३) म्युच्युअल फंड :- हा बेस्ट गुंतवणुकीचा प्रकार आहे. या साठी सरकार पण आपल्याला प्रोत्साहन देतात. यामध्ये आपले पैसे एक फंड मॅनेजर वेगवेगळ्या
ठिकाणी (वेगवेगळ्या सेक्टर मध्ये) उदा- बँक, फार्मा कंपनी, इंडस्ट्री इत्यादी ठिकाणी गुंतवतात. त्याचा असा फायदा होतो की मार्केट मध्ये काही चढउतार झालेच तर आपले पैसे बुडत नाहीत. ते ब्यालन्स करतात.

     Image Source-Google/ Image By- Money Control

म्हणजे सर्व सेक्टर हे डाउन झालेलं नसत एक खाली तर एक वर म्हणून यात नुकसानच प्रमाण खूप कमी आहे. कमी असे का म्हटले कारण ते अवलंबून आहे तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड प्रकारावर. म्युच्युअल फंड हे बेस्ट पर्याय आहे ,गुंतवणूक करण्यासाठी.

आणि यात आपल्याला एकत्र पैसे भरण्याची काही गरज पण नाही…दर महिन्याला ५००-५०० रुपये भरून सुद्धा तुम्ही SIP काढू शकता.म्हणून तर म्हणतात….म्युच्युअल फंड सही है…!

“Mutual fund investments are subject to market risks. Please read the offer document carefully before investing.”

(“म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे.  गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया ऑफर दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. ”)

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

हे वाचलंत का ? –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!