घरगुती व्यवसाय कोणता करावा।घरी करता येणारे व्यवसाय (business ideas for women at home in marathi)

आपण आज अश्या समाजात जगात आहोत जेथे महिला सर्व बाबतीत पुरुषांच्या बरोबरीने आहेत.

तथापि, इतर देशांच्या तुलनेत भारतात महिला उद्योजकांची कमतरता आहे. परंतु आत्ता भारतातील महिला पण कुठे मागे नाहीत. असे काही बोटावर मोजण्या सारखे क्षेत्र आहेत.

ज्यात आपल्या महिला भगिनी नसेल. परंतु सध्याची स्तिथी बघता महिला आज त्यांच्या करिअर बद्दल अधिक सक्षम आणि हुशार दिसत आहेत.

देशातील महिलांच्या उद्योजकीय क्षमतेचा परिणाम समाजातील आर्थिक स्थितीवर होऊ लागला आहे.

भारतातील महिला उद्योजक म्हणून इंटिरियर डिझायनिंग, फॅशन, जर्नलिझम आणि इतर बर्‍याच व्यवसायांच्या क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत.

स्वतःच घर, मुलबाळ सांभाळून आपला व्यवसाय सुरू करण्याच्या त्यांच्या जिध्येला माझा सलाम……

भारतातील बहुतेक स्त्रियाना तीच ती टीव्ही सिरीयल न बघता फावल्या वेळेचा सदुपयोग करावासा वाटतो. जेणेकरून आपल्या पतीला संसारात आर्थिक मदतीचा हातभार लागेल.

अशा महत्वाकांक्षी महिला उद्योजक जेव्हा अगदी योग्य व्यवसायाची निवड करण्याचा विचार करतात तेव्हा त्यांना भरपूर संघर्ष करावा लागतो.

त्यांच्या मनात काही कल्पना अस्पष्ट असतात. आणि डोक्यात विचारांचा काहूर…. की, योग्य असा कुठला व्यवसाय निवढायचा की जेणेकरून तो चालेल आणि आपल्या परीने सांभाळेल.

तर काळजी करण्याचे काही कारण नाही.  मी आहे ना…. येथे मी तुम्हाला अशा काही उद्योगांची माहिती देणार आहे जे तुम्ही तुमच्या आवळीनुसार योग्य तो व्यवसाय निवळू शकाल. चला तर मग आज आपण जाणून घेऊया घरी करता येणारे व्यवसाय……

१) फॅशन डिझाईन (Fashion Designing)

कपडे आणि दागदागिने हे महिलांच्या आकर्षणाचे साधने आहेत. या व्यवसायाला भारतातील स्त्रियांनी नेहमीच पसंती दाखवलेली आहे. आपल्याला आपले कपडे डिझाइन करायला आवडते का?  जर होय, तर आपला फॅशन डिझाईन व्यवसाय सुरू करा.

२) डे केअर सर्व्हिसेस (Day Care Services)

महिलांसाठी लहान व्यवसाय म्हणून डे केअर उघडण्याचा कल निश्चितच वाढत आहे.  कारण नोकरी करणार्‍या माता आपल्या मुलांसाठी डे केअर सुविधांच्या शोधात असतात. ज्यांच्या घरात लहान जागा असेल, त्या महिला सहजपणे हा व्यवसाय सुरू करू शकतात.

मुलांसाठी खेळण्यांनी त्या भागाची छान सजावट करा. ते सहजगत्या मुलासाठी खेळण्यायोग्य आकर्षक जागा बनेल.

३) बेकरी व्यवसाय (Bakery Business)

केक आणि बेकरी उत्पादनांची मागणी वाढत आहे. तुम्हाला फक्त पिठात प्रयोग करायला आवडत असेल, तर बेकरीचा व्यवसाय सहजपणे घरापासून सुरू केला जाऊ शकतो. 

आपला व्यवसाय रोलिंगमध्ये आणण्यासाठी आवश्यक असलेले थोडेसे कौशल्य आणि उपकरणांमध्ये छोटी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

तुमचा व्यवसाय ची ब्रॅण्डिंग तुम्ही स्वतः करू शकता. जसे की, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वत: ची जाहिरात करा.

४) इव्हेंट प्लॅनर (Event Planner)

वाढदिवसाची पार्टी असो, बेबी शॉवर, विदाई पार्टीज, विवाहसोहळा किंवा कॉर्पोरेट कार्यक्रम, त्रास न घेता लोकांना प्रत्येक प्रसंग योग्य रित्या व्हावयास वाटतो.

तर या ठिकाणी  इव्हेंटच्या आयोजकाची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आवडत असल्यास, हा व्यवसाय प्रारंभ करण्यास तुमच्या साठी योग्य आहे. जे काम आपल्याला मनातून आवळते. त्यात आपल्याला आनंद पण मिळतो आणि यश पण.

या मध्ये तुम्हाला कार्यक्रम आयोजित करणे व त्यास सुरळीत पार पाडणे हा इव्हेंटच्या आयोजकाचे काम आहे.
तुमच्या नातेवाईकाला ही तुमची कला कळू द्या. आज नातेवाईकाला माहिती मिळेल उद्या बाहेरील जगाला. ही व्यवसाय कल्पना तुम्हाला नक्कीच आवडली असेल.

५) फोटोग्राफी (Photography)

फोटोग्राफी हा व्यवसायांपैकी एक आहे, जो तुमचा फोटो काढण्याच्या आवळीने तुम्ही चालू करू शकता.

फोटोग्राफी व्यवसायातील प्रारंभिक गुंतवणूक ही केवळ कॅमेरा साठी लागणारी किंमत आहे.  महिलांसाठी फोटोग्राफी ही आज सर्वात सोपी आणि तितकीच फायदेशीर व्यावसायिक कल्पना आहे.

डिजिटल फोटोग्राफी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, एमेचर्स (amateurs)  सहजपणे फोटो क्लिक व्यावसायिक छायाचित्रे घेऊ शकतात. तुमच्या फोटो काढण्यात कॉलिटी असेल तर तुम्ही वाढदिवस, लग्न आणि पार्टी इव्हेंट साठी फोटो काढून पैसे कमावू शकता.

६) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने विकणे (Selling Products on E-Commerce)

सर्वात आधी मी ई-कॉमर्सला धन्यवाद देतो की, ज्यांच्यामुळे उत्पादने विक्री आणि खरेदी घराच्या जागेतून केली जाऊ शकते. 

ते  दिवस गेले जेव्हा आपल्याला आपली कामे पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज होती.
तंत्रज्ञानाच्या, साहाय्याने सर्व काही फक्त आपल्या बोटांच्या टोकावर आहे.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन उत्पादने विक्री करणे ही महिलांसाठी आणखी एक आकर्षक लहान व्यवसाय कल्पना आहे. 

साबण, मेणबत्ती आणि होममेड आर्टिफॅक्ट्स सारख्या हस्तकलेच्या उत्पादनांसाठी तुम्ही विक्री सहज करू शकता.  आणि भरपूर पैसे कमावू शकता.

७) कूकिंग (Cooking)

महिला म्हटलं म्हणजे स्वयंपाक (कूकिंग) हे आलंच. तुम्हाला स्वयंपाक करणे आवळत असेल आणि तुमच्या हाताला चव असेल तर तुम्ही मेस चालू करू शकता.

कॉलेज मधल्या मुलामुलींना डबे पुरवू शकता.
हा व्यवसायाला सध्या खूप प्रमाणात मागणी आहे. हा व्यवसाय तुम्ही छोट्या प्रमाणात चालू करून मोठा करू शकता.

८) लेखक (Freelance Writing)

ई-कॉमर्स व्यवसायात वाढ झाल्याने लेखकांच्या मागणीत वाढ झाली आहे.  व्यवसाय त्यांच्या व्यावसायिकांबद्दल प्रभावी लेख तयार करण्यासाठी व्यावसायिक लेखक शोधत आहेत, जे त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा पेक्षा छान लेख लिहू शकेल.

फ्रीलान्स लेखन ही भारतातील स्त्रियांसाठी सर्वात फायदेशीर लघु व्यवसाय कल्पना आहे, कारण गुंतवणूकीची किंमत शून्य आहे आणि आपल्याला कार्यालयीन वेळेत काम करण्यास बांधलेले नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कांम करू शकता.

तुम्ही तुमच्या घरून काम करणे सुरू करू शकता. तुमच्या लेखन शैलीमुळे तुम्ही एक चांगले फ्रीलन्सर लेखक बनू शकता. त्यामुळे तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता.

९) ऑनलाईन ट्युटोरिअल/ क्लास (Online tutorial/Class)

ऑनलाईन ट्युटोरिअल/ क्लास हे घर बसल्या काम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

जर तुम्हाला एखाद्या विषयात चांगले ज्ञान असल्यास किंवा तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे शिकू शकता. तर तुमच्या साठी ही फील्ड उत्तम आहे.

तुम्ही देखील ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करून पैसे कमावू शकता.

ऑनलाईन क्लास घेण्यासाठी बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अस्तित्वात आहेत. जसे की यू ट्यूब चॅनेल ज्याच्या साहाय्याने तुम्ही पैसे कमावू शकता.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…….

हे वाचा-


1 Comment

  • Pradip · 4 September 2020 at 11:19 AM

    It’s really useful for women…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *