Lagna in Marathi

marriage meaning in marathi

मुलींच्या आयुष्यातला सगळयात मोठा प्रश्न म्हणजे………..लग्न ?
            प्रत्येक मुलीच शिक्षण संपलं की, त्यांच्या घरच्यांना सर्वात पहिला पडणारा प्रश्न म्हणजे मुलगी आता लग्नाला आली. आता दोनाचे चार हात करायला हवे..!

“वयात लग्न झाले की बर राहत..!” असे वाक्य आपल्या समोर बोलल्या जाते आणि मुलीने नाही म्हटलं की इमोशनल आत्याचार केल्या जातोच. जसे की, आम्हाला तुझं सुखं बघायचं आहे, आम्ही का तुझे दुश्मन आहोत, तुझ्या चांगल्या भल्याच आम्हालाच बघावं लागेल, तू लहान आहेस तुला दुनियादारी कळत नाही इत्यादी इत्यादी. 
मग काय त्या मुलीला पण हा प्रश्न पडतो की? आता झाला सगळं. संपले आपले दिवस. आता इकडे आपला काही नाही राहाल का तर आता तीला पण पडलेला प्रश्न म्हणजे ….लग्न ?

          मग चालू होते मुलींची तारांबळ उडन. आता काय करायचं? आपल्याला तर सध्या लग्न नाही करायचं. पण घरच्यांन कडे बघून, त्यांचा विचार करून ते लग्नाला होकार देतात. घरच्यांच्या आनंदातच आपला आनंद मानून पुढे चालतात.

           लहानपणी आपल्याला सांगीतल्या जाते की, अनोळखी व्यक्ततिशी बोलू नये. त्यांच्या दूर राहावे पण मग हा प्रश्न पडतो की लग्नाच्या वेळेस सुद्धा असच असत. आपल्याला पाहायला येणारा व्यक्ती हा पण आपल्यासाठी अनोळखीच असतो. मग कस त्यांच्या समोर जावं त्यांच्याशी बोलावं याचा विचार त्या वेळेस घरच्यांना नाही पडत.

प्रत्येक वेळी पाहुणे येत असलेकी भीती वाटते. ते कसे असतील? काय प्रश्न विचारतील? आपल्याला व्यवस्थित बोलता येईल न की नाही? हे सगळं डोक्यात फ़िरत राहत.

           प्रत्येकाच्या स्थळाविषयी अपेक्षा असतात. जर त्या पूर्ण नाही झाल्या तर काय करायचं…? हा सर्वांत मोठा प्रश्न पडतो. प्रत्येक मुलीला वाटते की आपल्याला साजेसा लाईफ पार्टनर मिळावा. मग ते नकळतच पुढील आयुष्याचे स्वप्न पाहायला लागते.  कुठल्या नाटकात किंवा पिच्चर मध्ये काही चांगले दाखवत असेल, तर ते त्यातच रंगून जाते.
तिला वाटते की असच काहीतरी आपल्याला पण मिळावं. असे विचार सतत चालूच असतात.

असो हे त्यांचा पर्यंतच मर्यादित असते.  काही मुलींचे स्वप्नच खूप भारी असतात काय तर,  “मेरा राजकुमार सफेद घोडेपर आयेगा, मुझसे शादी करके ले जायेगा” परंतु अस काहीही खऱ्या आयुष्यात नसतं. अस सगळं माहीत असल्यावर सुद्धा असे अनेक विचार मनात सुरूच असतात. आता त्याचा काय करावं,  “कंबख्त ये दिल किसींकी सुंताही नही”.

               लग्ना बद्दलचे प्रश्न हे मुलांना पण पडतात. कारण त्यांना पण एक अनोळखी मुलीला घरी आणायचं असत. तिच्या सोबत आयुष्य भर राहायचं असत. पण मुलांन पेक्षा मुलींना जास्त विचार, प्रश्न का असतात?

मला तरी असे वाटते की ते जेथे लहानाची मोठी झाली, जेथे तिचे सर्व लाड पुरवल्या गेले, तिची काळजी घेतल्या गेली, प्रत्येक वेळेस तिची साथ दिल्या गेली, तिला समजून घेतल्या गेले, तिला आनंदी कसे ठेवायचे याचा विचार केल्या गेला, चांगलीं शिकवणूक दिल्या गेली हे सर्व तीला मिळाले पण पुढेही आपल्याला असेच मिळेल का ? आपल्याला समजून घेतील का ?  स्वतःचे घर सोडून तिला दुसऱ्याच्या घरी जायचे असते . त्यामुळेच मुलींना जास्त टेन्शन असते.!

            सगळ्यांना सांभाळून घेता येईल न?  सगळयांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल न? घरचे सर्व कामे जमतील न? यातच तारांबळ उडते. त्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांनच वेगळंच असत. मुलीला सर्वच यायला हवं! त्यांच्या प्रश्ननाची उत्तर बरोबर नाही दिली तर मुलीला काहीच येत नाही. हे ते घोषित करून टाकतात. या जगात सर्वाना सगळंच जमत अस कोणीच नाही.

मग ही अपेक्षा का मुली कडून केली जाते? तिला पण काही गोष्टी नाही जमत पण ते तयार असते न सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला. फक्त तिला प्रेमाने, विश्वासात घेऊन त्या पुढे शिकवता पण येते. फक्त तिला चांगली साथ हवी मग पहा ते काय करु शकते ते.

              या सर्व गोष्टी मध्ये देवाला पण सोबत घेतल्या जाते. मग काय देवाला रोजच्या विनवण्या केल्या जातात. जेथे देव दिसेल तेथे प्रार्थना. देवा चांगलं मिळू दे, स्थळ अस भेटू दे, तस भेटू दे.  या गोष्टी ला देव पण कंटाळलेला असेलच . तो पण म्हणत असेल.

“काय रे हे मुलगी सुखाने बसू पण नाही देत राव…..!”
एवढं असून सुद्धा काही प्रश्न संपत नाही.
               त्यातल्या त्यात काही मुलांची अपेक्षा आपल्या लेवल ची शिकलेली असावी. त्याच बरोबर ते नोकरी करणारी असावी. एवढंच काय तर ते सिटी मध्ये नोकरी करणारी असावी आणि त्यातल्या त्यात ती सुंदर व सुसंस्कार असावी.

एवढं सगळं कसं कोणी असेल. संस्कारी हे सर्वच असतात. फक्त तेवढा मान मिळायला हवा. आपल्या शिक्षणाच्या लेवल चा विचार करायचा हे बरोबर आहे. पण या बाकी गोष्टी चा विचार थोडा तरी कमी करावा, नाहीतर आमच्या सारख्या मुलींचा काय होईल हा विचार करावा..!

          असो असे अनेक प्रश्न, त्यात होणारी गुंतागून, टेन्शन हे राहणार तर ते या बाकी गोष्टी मूळ. जर या गोष्टी कमी झाल्या तर अनेक मुलींच्ये प्रश्न सुद्धा कमी होईल. फक्त तिला अनोळखी नाही वाटेल अस काही तरी करा, तिला सांभाळून घ्या, समजून घ्या, एवढे ही केल, तरी अनेक मुलींना पडणार हा सर्वात मोठा प्रश्न “लग्न” हा थोडा तरी लहान होईल. अशी आशा बाळगते.

             माझा हा लेख तुम्हाला आवडेल की नाही हे तर सांगू नाही शकत. पण मला जे वाटलं. ते मी या लेख मध्ये लिहिण्याचं प्रयत्न केला. शांततेत वाचल्याबद्दल

धन्यवाद……

– कु. रितिका तायडे 

हे वाचलंत का ? –

6 thoughts on “मुलींच्या आयुष्यातला सगळयात मोठा प्रश्न म्हणजे..? लग्न”

  1. Agdi barobar… me pn ya sthititun geli… maza anubhav mala hech sangun gela ki ati ghai sanktat nei… mala lagnala vel lagla pn kharch aaj me far khush ahe.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!