पॅन कार्ड कसे काढावे

PAN म्हणजे काय..? पॅन कार्ड कसे काढावे व पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे.

आपल्या देशात Permanent Account number म्हणजेच पॅन कार्ड हे एक महत्वाचे document आहे. जे आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. ज्यामध्ये तुम्हाला एक 10 अकी PAN (PERMANENT ACCOUNT NUMBER)  नंबर दिला जातो जो तुम्ही आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरु शकता.

प्रत्येक देशात तेथील नागरिकांची ओळख पटवण्यासाठी ओळखपत्र असतात, तसेच आपल्या देशात पण ओळखपत्र आहेत जसे Adharcard, driving licence, Voting card या प्रकारच्या ओळखपत्रानेच समजते की तो कोणत्या देशाचा नागरिक आहे. 

तसेच देशातील आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी  Pan card हे वापरले जाते.

तुमचा  IT RETURN 50,000 च्या वर असेल तर तुम्हाला पॅन कार्ड लागेलं तसेच बँक मध्ये पण कोणताही व्यवहार किंवा खाते उघडण्यासाठी Pan card गरजेचे आहे.

Pancard हे आपल्या देशात एक ओळखपत्र म्हणून पण वापरले जाते Pancard हे फक्त भारतीय नागरिकच नांही

तर विदेशी नागरिकांना पण लागू आहे .

 (NRI) विदेशी नागरिकांनसाठी नोंदणी प्रक्रिया वेगळी आहे. 

Pancard म्हणजे काय आहे..?

आधी आपण थोडक्यात जाणून घेऊ की Pancard काय आहे. तर मित्रांनो तर हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे.

पण हे आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणार ओळखपत्र आहे, जस आपण voting करतांना votingcard हे ओळखपत्र म्हणून वापरतो तसेच आर्थिक व्यवहार करतांना Pancard हे ओळखपत्र म्हणून वापरतात.

Pancard कसे दिसते..?

Pancard हे दिसायला तसे तर आपण जे Bank चे Atm card वापरतो तसेच राहते पण त्या वर आपली माहिती ही थोडी जास्त राहते. 

तुमचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, तुमची सही, तुमचा फोटो, व अगदी महत्वाचा असलेला तुमचा PAN NO जो एका कोपऱ्यात लिहलेला राहतो जो काही NO मध्ये असतो व काही अँल्फाबेट्स मध्ये दिलेला असते.

पॅन कार्ड कसे काढावे..?

Pancard हे तसे तर खुप लवकर व सोप्या पद्धतीने तयार करता येते. पण तुम्हाला pancard तयार कस करायच? त्यासाठी documents कोणते लागतात? हे माहीत असने गरजेचे आहे.

तुम्हाला pancard काढण्यासाठी document  कोणते लागतात हे माहीत नसेल तर pancard काढताना  काही अडचणी येऊ शकतात.

आज भारतातील जवळपास सर्व शहरांमध्ये pancard काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जर तुम्ही स्वत तुमचे pancard तयार करीत असाल तर तुम्हाला आधी एक Form भरावा लागतो.

FORM 49A

हा form तुम्हाला  कोणत्या पण cyber cafe मधुन किंवा xerox Shop वर मिळुन जाईल. आपन हा form आयकर विभागाच्या अधिकृत website वरुन देखील Download करु शकता.

Form Download  करण्यासाठी येथे क्लिक करा.

> www.tin-nsdl.com

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

आपन जो 49A form घ्याल त्यामध्ये काही महत्वाची माहिती भरावी लागेल. त्याच सोबत तुम्हाला काही अजुन कागदपत्रे जोडावे लागतात.

ते खाली दिलेले आहे. तुम्ही यामधील कोणते पण जोडु शकता.

> Date of birth proof | जन्म प्रमाणपत्र

Date of birth proof  म्हणुन तुम्ही जन्म प्रमाणपत्र पण जोडू शकता. कीवा 10 12 ची मार्कशीट पण जोडु शकता.

> Address proof | आधार कार्ड 

Address proof साठी तुम्ही Adhar card जोडु शकता.

> Identity proof.

ओळखपत्र म्हणून तुम्ही Ration card, Passport, driving licence हे जोडु शकता.

तुमचे वय जर 18 च्या वर असेल तर तुम्ही Pancard साठी स्वत अर्ज दाखल करु शकता. जर तुमचे वय हे 18 वर्षा च्या आत असेल तर तुम्ही स्वत  Pancard साठी अर्ज दाखल करु शकत नाही. 18 वर्षा खालील व्यक्ती साठी अर्ज त्याचे पालक करु शकतात.

 Pancard काढण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही . कोणत्याही वयाचा व्यक्ती Pancard काढु शकतो.

  • धीरज तायडे

हे वाचलंत का ? –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!