Kulith in marathi

तुम्ही कुळीथ हे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल. कुळीथ चे खूप फायदे आहेत. कुळीथ डाळीला पोष्टीकतेत सर्वोच्च स्थान मिळाले आहे. 
कुळीथ डाळीला खूप पौष्टीक डाळ मानली जाते. कुळीथ मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने, कुळीथ डाळ (kulthi dal) संपुर्ण जगात खाल्ली जाते. या पोस्ट मध्ये आपण कुळीथ डाळ चे फायदे, उपयोग आणि नुकसान याची माहिती घेणार आहोत.

Image Source – Wikipedia

horse gram meaning in marathi

कुळीथ (हुलगे) म्हणजे काय? – horse gram in marathi

कुळीथ ला हुलगे (हुलगा) असे सुद्धा म्हणतात. तर इंग्रजी मध्ये कुळीथ ला Horse gram म्हटले जाते. हुलगा डाळीचा उपयोग आधी घोड्याचा चारा म्हणून केल्या जात असे. काही संशोधना नंतर असे लक्षात आले, की कुळीथ डाळ मध्ये प्रोटीन हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. 

तेव्हा पासून हुलगे डाळ आपण सुद्धा खात आहोत आणि ही डाळ आरोग्यासाठी खूप फायद्याची ठरत आहे. या डाळी मध्ये प्रोटीन ची मात्रा भरपूर असल्याने ही कुपोषण कमी करण्यात मदत करते. हुलगा डाळीमध्ये असलेल्या प्रोटिन साठी ओळखली जाते.

कुळीथ (हुलगे)पोषण तत्व

कॅलरी321 किलो कॅलरी
फाइबर5.3%
प्रोटीन  22%
कार्बोहाइड्रेट57.2%
कैल्शियम287 mg
फास्फोरस311 mg
फैट0.50%
आयरन6.77 mg
थियामिन0.4 mg
राइबोफ्लेविन0.2 mg
नियासिन1.5 mg

कुळीथ चे फायदे – Benefits of horse gram

या डाळी मध्ये असलेले प्रोटीन माहीत झाले, की आपल्याला ही डाळ खायला आवडेल. तर कुळीथ डाळ खाणे चालू करण्याआधी आपण या डाळी चे फायदे जाणून घेऊ. कुळीथ डाळ तुम्हाला तुमच्या आरोग्यातील समस्यान पासून सुटका मिळून देऊ शकते.

1) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कुळीथ

हुलगे तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते व काही संशोधनांन मध्ये असे लक्षात आले, की कुळीथ डाळ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून, चांगल्या कोलेस्ट्रॉल लेवल ला वाढवण्यात मदत करते. यामुळे म्हंटले जाते की ही डाळ हृदयासाठी एक वरदान आहे.

2) किडनी स्टोन साठी फायदे

किडनी स्टोन साठी हुलगा डाळ खूप लाभदायक मानली जाते. आपल्या शरीरात कॅल्शियम चे प्रमाण जास्त वाढल्यामुळे किडनी स्टोन होण्याची प्रमाण वाढून जाते. या ठिकाणी कुळीथ चे फायदे कामी येतात, कारण कुळीथ मध्ये खूप प्रमाणामध्ये अनिऑक्सिडेंट उपलब्ध आहे. 

जे तुमच्या शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण आटोक्यात ठेवते. तुम्हाला किडनी स्टोन चा त्रास असेल, तर तुम्ही कुळीथ चे पाणी पिऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन असल्यास आराम मिळेल.

3) ताप व सर्दी मध्ये कुळीथ डाळ चे फायदे

ताप, सर्दी झाल्यास हुलगे (horse gram) तुमची मदत करू शकतात. सर्दी तापी मध्ये तुम्ही कुळीथ डाळ खाऊ शकता. यामुळे तुम्हाला ताकद मिळून तुम्ही लवकर बरे होणार.

4) त्वचे साठी कुळीथ डाळ चे फायदे

त्वचे साठी कुळीथ चे खूप फायदे आहेत. कुळीथ त्वचे ला सुंदर व रोगमुक्त ठेवण्यास मदत करते. कुळीथ चा वापर तुम्ही त्याचा पेस्ट करून त्वचे वर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचे वरील मृत पेशी निघून जातील व त्वचा उजळेल. यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेला सनबर्न पासून पण वाचू शकता.

5) केसांनसाठी फायदे

हुलगा खाल्ल्याने केस मजबूत होतात. हुलगा ला तुम्ही त्याचे पाणी करून किंवा भिजवुन डाळ खाऊ शकता. हुलगा पासून केसांना पौष्टिक तत्व मिळतात.

6) पचनशक्ती साठी फायदे

चांगल्या आरोग्यासाठी आपली पचनशक्ती स्वस्थ असणे गरजेचे आहे. या साठी फायबर हा घटक आपल्याला फायद्याचा ठरतो. फायबर आपल्याला हुलगे मधून मिळते. जे पोटासंबंधी विकार दूर करण्यास आपली मदत करते. व आपल्या पचनशक्तीस चांगले ठेवते.

7) अल्सर असल्यास फायदेशीर

जसे की आपल्याला वर सांगितले. हे डाळ आपली पचनक्रिया चांगली ठेवते. कुळीथ मध्ये फ्लेवोनोड्स हा घटक आहे. जो आपल्या पचनक्रियेला चांगलं ठेवतो. पचनक्रियेला चांगली राहीली तर आपले पोट साफ राहील. ज्यामुळे पोटाचा अल्सर होण्याची शक्यता कमी होते.

8) शुगर पेशन्ट्स साठी फायदे

तुम्हाला शुगर असेल, तर कुलथी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. काही संशोधनात हे आढळून आले आहे, की कुळीथ डाळ शुगर असणाऱ्या पेशन्ट्सनी रोजचा आहारात खाल्ली, तर त्याचा शरीरातील इन्सुलिन लेवल आटोक्यात राहून; त्याची शुगर अचानक कमी जास्त होत नाही. शुगर असणारे पेशन्ट ही डाळ आहारात समाविष्ट करू शकतात. तरी पण एकदा डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कुळीथ डाळीचे दुष्परिणाम 

कुळीथ चे फायद्या प्रमाणे त्याचे काही नुकसान सुद्धा आहेत.

 • प्रेग्नन्सी मध्ये ही डाळ खात असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
 • या डाळी मध्ये फायबर मोठया प्रमाणात आहे. तर ही डाळ जास्त खाणे टाळावे.
 • ज्यांना ऍसिडिटी चा त्रास आहे, त्यांनी ही डाळ खाऊ नये.

  कुळीथ रेसिपी – Kulith recipe in marathi

तुम्हाला जर सूप पिणे आवडत असेल, तर हुलगे ही जेवढी पौष्टिक आहे. तेवढीच चवीला पण चांगली आहे. कुळीथ पासून सूप तयार करणे, बाकी सुप तयार करण्या सारखेच आहे. 

 • कुळीथ डाळे पासून सूप तयार करण्यासाठी; डाळ ही 45 मिनिटे पाण्यात उकडून घ्या. जेव्हा तुम्हाला वाटेल डाळ थोडी सॉफ्ट झाली आहे. तेव्हा ती काढून घ्या.
 • दुसरीकडे एका भांड्यात तेल गरम करून घ्या.
 • तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडे जिरे, लसून, कांदा, अद्रक, आणि हिरवी मिर्ची टाका.
 • हा सर्व मसाला चांगला भाजून घ्या.
 • आता थोडे टमाटर कापून, त्यात टाका आणि ते चांगलं शिजवा.
 • हे सर्व टमाटर चे मिश्रण शिजल्यावर, त्यात उकडलेली जी कुळीथ डाळ आहे. ती टाका व ते चांगल्या प्रकारे शिजवू द्या.
 • शिजत असतांना तुम्हाला जेवढं सूप पाहिजे, तेवढं पाणी त्यात टाका.
 • आता पाणी टाकल्यावर त्याला शिजू द्या.
 • गॅस बंद करून ते खाली उतरवून घ्या. तुमचे सूप तयार झाले आहे

हुलगा बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

प्रश्न-1) आपण ही डाळ रोज खाऊ शकतो का?

उत्तर :- हो तुम्ही जर कमी प्रमाणात ही डाळ खात असाल, तर तुम्ही ही डाळ रोज खाऊ शकता. तुम्ही तूमच्या डायट प्लॅन मध्ये पण याचा समावेश करू शकता.

प्रश्न- 2) कुळीथ डाळ किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे का?

उत्तर :- आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जमा झाले, की किडनी स्टोन होण्याची भीती राहते. कुळीथ डाळ मध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट हे तुम्हाला किडणी स्टोन होण्यापासून वाचवते.

कुळीथ डाळ ही आहारामध्ये जास्त खाल्ली जात नाही. या डाळीचे जेवढे फायदे आहेत, त्याप्रमाणे हि डाळ खूप प्रमाणात खायला हवी. कुळीथ डाळी ला तुम्ही तुमच्या डायट प्लॅन मध्ये सुद्धा ऍड करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला फायदेच होतील. kulith in marathi पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा.

 • धिरज तायडे

📢 (महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला कुळीथ बद्दल माहिती देणे असल्याकारणाने कुळीथ चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

 • 🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का? –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Open
1
नमस्कार,
माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..!