NPA म्हणजे काय?।NPA meaning in marathi

npa meaning in marathi

npa meaning in marathi

image source – moneycontrol.com

NPA काय आहे? हे मागील काही वर्षांपासून आपल्या देशात एक चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारणीभूत आहेत देशातील काही मोठे व्यवसायी मंडळी.

जसे विजय माल्या, नीरव मोदी , ललित मोदी, यानी जे केले त्यावरुन तुमच्या लक्षात आले असेलच. चला तर समजून घेवु कि NPA आहे तरी काय..?

NPA म्हणजे काय?

NPA चा FULL FORM हा NON PERFORMING ASSET असा होतो. जेंव्हा कोणी कर्जदार आपले बॅक जवळुन घेतलेले ऋण (loan) चुकवू शकत नाही. तो त्याचे हप्ते फेडण्यास असमर्थ होतो. तेंव्हा त्याचे कर्जाचे खाते हे NPA होते.

म्हनजेच बँकेने जे त्याला कर्ज दिले आहे. ते आता डुबले आहे. ते कर्ज आता बँकेला कधी परत मिळणार नाही. अशा प्रकारच्या डूबलेल्या कर्जाला NPA म्हनतात.

जेंव्हा कोणतीपण बॅंक कीवा वित्तीय संस्था पुढील प्रकारचे लोन देतात जसे- EDUCATIONAL LOAN, HOUSE LOAN, BUSINESS LOAN, GOLD LOAN, PERSONAL LOAN, CAR LOAN, BIKE LOAN, COMMERCIAL VEHICLE LOAN, KRUSHI LOAN, या व्यतिरिक्त आणखी काही कर्ज.

जर 3 महीने म्हनजेच 90 दिवसा पर्यंत घेतलेल्या कर्जाचे व्याज भरल्या नाही गेले. तर ती वित्तीय संस्था त्या कर्ज खात्याला NPA खाते अशे घोषित करते.

जेव्हा कोणते पण लोन खाते NPA होत असल्यास समजून जायच की, त्या पैशाचे आपल्या ECONOMY मध्ये काहीही योगदान नाही. जेव्हा एक सामान्य नागरीक 1 लाख किवा 5 लाखापर्यंत व्याज परत करु नाही शकत.

तेव्हा वित्तीय संस्था ते लोन परत मिळवीण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डोके लावतात. जर वित्तीय संस्थान कडुन काही केल्या ते पैसे परत मिळत नाहीत तेव्हा त्या संस्था सरकारला नोटीस पाठवतात पण जोपर्यंत ही सर्व कार्यवाही होते. तो पर्यंत तो कर्जदार देश सोडून गेलेला असतो.

कर्ज खाते NPA केव्हा होते..?

जेव्हा कोणता पण नागरिक कुठल्याही वित्तीय संस्थेतून कर्ज काढतो. त्या नंतर ज्या संस्थेने त्याला कर्ज दिले. त्या कर्जाच्या व्याजा मधुन या वित्तीय संस्था नफा कमावतात.

पण काही अडचणीमुळे तो कर्जदार त्याचे कर्ज लागोपाठ तीन महीने व्याजा सहीत परत करु शकत नाही. तेव्हा ती संस्था या प्रकारच्या कर्ज खात्यांना NPA मध्ये टाकतात.

या नंतर संस्था त्या कर्जदारांना नोटिस पाठवतात. परंतु आता याचा फायदा नाही. जर पैसेच नाही, तर नंतर नोटीस बजावण्यात आल्या वर पण पैसे नाही मिळाले तर त्या संस्थेने जे त्याची PROPERTY MORTGAGE केली असते ती जप्त करते व त्याचे पैसे ती PROPERTY विकून काढतात.

NPA मुळे वित्तीय संस्थाना कोणते नुकसान होते..?

कोणत्या पण वित्तीय संस्थेचा NPA वाढला की, त्या संस्था दिवाळखोरी वर लागतात . परंतु RBI ने यासाठी आधीच काही नियम व अटी तयार केल्या आहेत.

कोणत्या पण वित्तीय संस्थेला प्रोवीजन ची रक्कम ही त्यांच्या व्यवहारातून वेगळी ठेवावी लागते. एका REPORT नुसार आपल्या भारतातील बँकेचा NPA हा 8.50 लाख इतका आहे.
ही रक्कम 10% आहे. जी खुप आहे.

बँकेचा NPA वाढला की, त्या बँकेला मिळणारा फायदा हा कमी होतो. या कारणामुळे आपल्या सरकार ला मिळणारे उत्पन्न कमी होते. त्यामुळे सरकारच्या गुंतवणूकी मध्ये कमी पाहायला मीळते. यामुळे देशाचा विकास हा कमी होतो. कींवा मंदावतो सोबतच देशात रोजगार कमी निर्माण होतात.

आज तुम्हाला देशाच्या अशा हालतीचे कारण समजले असेल. NPA च्या याच कारणामुळे वित्तीय संस्था ह्या गुंतवणुकीवर व्याज कमी देतात व कर्जावर व्याज जास्त घेतात.

या अश्याच कारणानमुळे 2007 मध्ये जागतिक मंदी आली होती. या मंदीतून बाहेर निघण्यासाठी बॅकाचे खुप मोठे योगदान होते. परंतु या मंदीमुळे बँकांना पण नुकसान झाले. यामुळे अर्थव्यवस्थेवर परीणाम झाले. यामधून खुप समस्या निर्माण झाल्या, जसे बँकांनी लोन देणे कमी केले. NPA वर काही प्रभावी उपाय नसल्याने.

काही मोठ्या PROJECT च्या कामावर त्याचा परिणाम झाला कारण बँकां या मोठ्या PROJECTS ना पैसे म्हनजेच कर्ज देण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यामुळे जे उद्योगपती कर्जदार होते. ते कर्ज भरु नाही शकले आणि नवीन लोन घेण्याची पण परीस्थिती नव्हती. म्हणुन ते देश सोडून गेले.

DEBT RECOVERY Tribunals म्हणजे काय..?

  • बँकांना 1990 च्या आधी Bad Loan recovery करण्यासाठी खुप अडचणी येत होत्या.
  • 1993 नंतर सरकार ने NPA RECOVERY व्हावी यासाठी RECOVERY TRIBUNALS या आयोगाचे गठन केले.
  • या आयोगानुसार लोन घेणारा हा कोर्ट मध्ये कोणतीही अपील नाही करु शकत.
  • NPA शी निगडीत सर्व केसेस ह्या DEBT RECOVERY TRIBUNALS मध्ये येतात.
  • DRT मध्ये पण 75000 केसेस ह्या अजुन पेंडीग आहेत.

2002 मध्ये आपल्या सरकार नी SARFAESI Act. लागु केला त्याबद्दल पुढे पाहु.

SARFAESI ACT काय आहे..?

  • SARFAESI ACT FULL FORM :- SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.

हे आपन एका उदाहरणातून समजुन घेवू.
समजा आनंद ने एक कंपनी चालू केली. त्या कंपनी मध्ये तो food products तयार करणार.

  • यामध्ये त्याने त्याचे 1 करोड रुपये टाकले.
  • बँक जवळुन 1 करोड रुपये घेतले.

काही दिवस कंपनी मस्त चालली व काही अडचणी येत गेल्या कंपनी हळुहळु बंद पडण्याच्या मार्गावर आली. त्याच्या कंपनीमध्ये काम करीत असलेल्या नोकरदाराना पण पगार द्यासाठी पैसे नसतील. तर तो अशा वेळेस बँकेच्या EMI कशा भरेल.

जर त्याने बँकेच्या 3 महीने EMI नाही भरला, तर बॅक त्याचे कर्ज खाते NPA मध्ये टाकुन देइल. बँक जसे त्याला NPA मध्ये टाकेल तेव्हा SARFAESI ACT नुसार कार्यवाही चालु होइल.

SARFAESI ACT कसा काम करतो..?

● बँक ही आनंद ची PROPERTY कोर्टाच्या आदेशाविना जप्त करु शकते.
● त्याची PROPERTY विकून बॅंक त्यांचे पैसे काढु शकतात.
● PROPERTY जर त्याने कुणाला विकली तरी देखील ती जप्त केली जाते.
● त्याच्या नावाने चल कींवा स्थिर संपती असेल ती सर्व जप्त केली जाते.
● या अंतर्गत फक्त 10 लाखापर्यंत केस येतात.

  • धीरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top
हो (Yes)
1
नमस्कार, माहिती लेक मध्ये आपलं स्वागत आहे.!

माहितीलेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.!

तुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास "हो"(Yes) या बटन क्लिक करा! 😊